जगाला भेडसावणारे प्रश्न व शास्वत विकास साधण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरा व संस्कृत उपयोगी -प्रो गणती सुर्यनारायण मुर्ती

0
पुणे  दि 28 (प्रतिनीधी) - प्रो गणती मुर्ती यांनी जगा पुढील सर्व समस्या, शास्वत विकास या साठी संपूर्ण जगाला भारतीय ज्ञान उपयोगी होईल व ते ज्ञान व आधुनिक विज्ञान याची सांगड घालावी लागेल; त्या साठी संस्कृत अभ्यास करावा लागेल. एका वेगळ्या दृष्टीकोनातून या कडे पाहावे लागेल तरच शास्वत विकास साधेल.आज संपूर्ण जगात  पर्यावरण, आर्थिक विषमता, शेती, आरोग्य, स्त्री पुरुष समानता यातील प्रश्न आवासून उभे आहेत केवल आधुनिक विज्ञानाचे आधारे यावर उपाय मिळेल असे नाही. एका वेगळ्या दृष्टीकोनातून उपाय शोधावे लागतील. निर्सगाचे मनमानी पद्धतीने शोषण करून नाही तर किमान वापर, निर्सगाचे पुन्हा संवर्धन शोषण नाही तर दोहन करणेची भारतीय दृष्टी जगाला दयावी लागेल  असे प्रतिपादन प्रो गणती यांनी केले. भारत सरकार, दिल्ली च्या शिक्षण विभागा अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा या विभागाचे ते संचालक आहेत. 

संस्कृतभारती पश्चिममहाराष्ट्र प्रान्त द्वारा आयोजित संभाषण शिबिर चालक प्रशिक्षण वर्गाचा समारोप कार्यक्रम दि. २८ मे २०२३ रविवारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गात पश्चिम महाराष्ट्रातून  ५० प्रशिक्षकांना संस्कृतमधून संभाषण कसे शिकवावे? संस्कृत संभाषण शिबिर कसे चालवावे ? यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. 
पश्चिम महाराष्ट्र प्रांत शिक्षणप्रमुख गोविंदराज कासूल यांनी प्रशिक्षितांना दीक्षा दिली. 
सायंकाळी आयोजित प्रकट समारोप कार्यक्रमात या नूतन दीक्षित कार्यकर्त्यांनी प्रतिभा प्रदर्शन संपूर्ण संस्कृत मधून  सादर केले. 
प्रा गणती यांनी भारतीय ज्ञान मध्ये संस्कृत ला पर्याय नसून अनेक ग्रंथ नव्याने अभ्यासावे लागतील त्याचे बरोबर आधुनिक विज्ञान याची जोड दयावी लागेल व त्यात त्यांचा विभाग काय काम करतो तसेच,  नवीन शब्द तयार करण्याचे संस्कृत भाषेचे सामर्थ्य प्रतिपादित केले. 
संस्कृतभारती द्वारा संचालित उपक्रमांबद्दल शुभेच्छा देत संस्कृतचे महत्त्व विविध उदाहरणांनी अधोरेखित केले. 
या समारोप कार्यक्रमात डॉ. प्रसाद जोशी, डॉ. रामचंद्र शिधये, कर्नल् सतीश परांजपे उपस्थित  होते. संस्कृत कार्याची माहिती व प्रास्ताविक विनय दुनाखे प्रांत मंत्री यांनी केले.  संस्कृतभारतीचे प्रांत अध्यक्ष कर्नल सतीश परांजपे व वर्गाधिकारी डॉ. रामचंद्र सिधये, डेक्कन कॉलेज संस्कृत विभाग प्रमुख प्रसाद जोशी हे मान्यवर उपस्तित होते, त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आसावरी बापट यांनी आभार तर नितीन तारे यांनी व्यक्तिगत गीत सादर केले. 
अनेक संस्कृत प्रेमी नागरिक विद्यार्थी, शिक्षक, संस्कृतभारती कार्यकर्ते समारोपासाठी जमले होते. त्यामुळे सर्व परिसर संस्कृतमय वातावरणाने  भारुन गेला होता.
या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षित सर्वांनी दृढनिश्चय प्रकट केला की,  जून जुलै महिन्यात विविध ठिकाणी संस्कृत संभाषण वर्गांचे आयोजन करू अशी माहिती प्रशिक्षणवर्ग कार्यवाह संदीप देशमुख यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)