पंढरपूर (प्रतिनिधी) -- आगामी निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने, आरक्षण हा मुद्दा वापरू नये असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी पंढरपूर येथे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे व्यक्त केले.
स्वराज्य संघटना गावभेट दौरा यासाठी ते पंढरपूर येथे आले होते.यावेळी त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समिती कार्यालयात सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक बालाजी पूदलवाड, मंदिर समितीचे कर्मचारी
उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले सध्या कोण कुठे आहे काहीच कळत नाही.संघटनेची स्थापना झाल्यापासून राज्यात फिरत आहे, अस्थिर वातावरण पाहून लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.स्वराज्य संघटना शेवटच्या घटका पर्यंत पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे.२०२४ मध्ये आम्ही निवडणुकीत उतरूअसे ते म्हणाले.
राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर आली असून लोक स्वराज्यकडे पर्याय म्हणून पाहत आहेत.विकास सोडून इतरच गोष्टीवर पुढारी टीका करीत आहेत. असे छ्त्रपती संभाजी राजे म्हणाले, यावेळी स्वराज्यचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

