मंगळवेढा प्रतिनिधी - येथील भैरवनाथ शुगर लवंगी  हा कारखाना  गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गळीत झालेल्या ऊसास प्रती मे.टन ५१ रु. प्रमाणे दुसरा हप्ता देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी केली. यावेळी ते म्हणाले की,   दिवाळीसाठी म्हणून ५१ रु. ज्यादा दर देणार असल्याची घोषणा कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून कारखाना प्रशासना कडून सदरची रु.५१ प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर आज दिनाक १३/११/२०२३ रोजी वर्गही करण्यात येणार आहे.
मात्र ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक, ठेकेदार व प्रमुख पदाधिकारी यांनी कारखाना प्रशासनाकडे अधिकच्या दराची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार, व कारखान्याचे  मार्गदर्शक प्रा. ना. डॉ. तानाजीराव सावंत साहेब  यांच्या सुचनेनुसार त्यांच्या मागणीचा व दुष्काळी परिस्थितीचा सकारात्मक विचार करून दिवाळी साठी नव्याने ५१ रु प्रती मे.टन दर देणार असल्याची घोषणा चेअरमन शिवाजीराव सावंत साहेब यांनी केली आहे. .
            सदरची रु.५१रु प्रती मे.टन प्रमाणे होणारी रक्कम ही ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रतीवर्षीप्रमाणे  दीपावलीसाठी ऊस उत्पादक यांच्या करीता सवलतीच्या दरातील साखर वाटप हे भैरवनाथ शुगरच्या संबंधीत गट विभागातून दिनांक ११/११/२०२३ पासून करण्यात येणार आहे.तसेच गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता यापूर्वीच घोषित केल्या प्रमाणे पहिली उचल ही रु. २५५१ प्रमाणे देणार असल्याचे ही सावंत यांनी यावेळी सांगितले.
             यावेळी अनिल दादा सावंत व्हा. चेअरमन भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांनी भैरवनाथ शुगर लवंगी ला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी  मा बाळासाहेब शिंदे साहेब जनरल मॅनेजर व मुख्य शेती अधिकारी शिवाजी चव्हाण व शेती अधिकारी  कृष्णदेव लोंढे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच पंढरपूर मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, ऊस उत्पादक शेतकरी आदि उपस्थित होते.

