प. पू. स्वामी श्री. गोविंददेव गिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती
संतांचे राष्ट्रधर्म पालनासाठी दिलेले योगदान व समाजप्रबोधन या विषयावर होणार पंढरीत समाज प्रबोधन
पंढरपूर (प्रतिनिधी) - मनमाडकर यांचे आरती मंडप येथे सर्व हिंदू बांधवांसाठी विश्व हिंदु परिषद, पंढरपूर यांचे वतीने राष्ट्रीय संत संमेलनाचे आयोजन दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक आणि आशीर्वचन प. पू. स्वामी श्री. गोविंददेव गिरीजी महाराज
कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या हे करणार आहेत.
सद्य परिस्थितीतील लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद या सारख्या घटना वारंवार घडत असताना हिंदू संत, महंत, धर्माचार्य यांनी या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंची सुरक्षितता या बाबतीमध्ये चिंतन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तरी सर्व हिंदू बांधवांनी देव देश धर्म कार्य संरक्षणार्थ या संमेलनास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

