कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला सुरुवात...
पंढरपूर (प्रतिनिधी) - दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने याही वर्षी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सव सुरुवात झाली आहे. सदर कृषी महोत्सवात शेती विषयक नवंनविन विविध प्रकारचे माहितीचे स्टाॅल उभारण्यात आले आहेत.
हे कृषी महोत्सव प्रदर्शन ३ जुलै ते ७ जुलै पर्यंत हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार असून हे प्रदर्शन शेतकरी बंधू व वारकरी यांना नवीन गोष्टी पाहता येणार आहेत. या कृषी वारीच्या प्रदर्शनात वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच शेगड्या, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, शेतकरी अवजारे, शेती साठी उपयुक्त वस्तू शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञानाची माहिती पंढरीत आलेल्या वारकऱ्यांच्या पसंतीच्या वस्तू शेतकऱ्यांना लागणारे शेतीसाठी उपयुक्त अशी अवजारे कमी किमतीमध्ये जास्त व्हरायटी उपलब्ध केली असून इलेक्ट्रिक वस्तूही या प्रदर्शनात उपलब्ध केल्या आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे.
या उदघाटना वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह वेगवेगळ्या खात्याचे मंत्री या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत.

