प्रतिभाताई परिचारक नगर, लक्ष्मी टाकळी येथे ओढ्याच्या कामास सुरुवात

0


साठे बंधूंच्या प्रयत्नाने अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकाली

 
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी नवीन वसाहती मधील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सरपंच संजय साठे यांच्या कारकिर्दीत अखेर ओढ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.


             या कामासाठी सांडपाणी व्यवस्थापनातून मिळालेला 65 लाख रुपये रकमेचा भरघोस निधी हे ना.एकनाथजी शिंदे  व महेशनाना साठे यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. शासनाच्या अडचणींवर मात करून कमिटी नेमली, सर्वेक्षण केले आणि  या कामाची सुरुवात घडवून आणता आली. 
            ओढा झाकणे व ९०% सांडपाणी दुर्गंधी मुक्त  करणे या कामात महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील  यांचे मोठे योगदान आहे. इतिहासात पहिल्यांदाच लक्ष्मी टाकळीला आषाढी वारी तीर्थक्षेत्रात समाविष्ट करून, ३०० टॉयलेट, ५०० बाथरूम आणि ३० वॉटर टँकर मिळाले

            ठाकरे चौक – लक्ष्मी टाकळी चौक रेल्वे फ्लायओव्हर प्रकल्पासाठी ५८ कोटी निधी मंजूर झाला आहे. समाजकल्याण विभागातून विशेष प्रयत्नांनी १ कोटींचा निधी मिळाला आहे.
मागील यात्रेत घेतलेली शपथ पूर्ण करत यंदा शिवेवरील लक्ष्मी आई मंदिराकडे जाणारा रस्ता मुरुमाच्या रुंद रस्त्यावरून यात्रेत नेण्याचा मान मिळाला. आमचे साठे कुटुंब तुमच्या सेवेकरिता सदैव कटिबद्ध आहे.

            यावेळी मा.जि.प.सदस्य रामदास ढोणे, सरपंच संजय तात्या साठे, उपसरपंच रुपाली करंडे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे,  सागर सोनवणे, सदस्या नागरबाई साठे,  आशाबाई देवकाते,  रेश्मा साठे,  रोहिणी साठे, ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच विजयमाला वाळके, ग्रामसेवक जयंत खंडागळे, प्रशांत (बापू) डोंगरे, पैगंबर शेख, रोंगे सर,  प्रा.अनंत कुलकर्णी गिरवीकर, आबासाहेब खरात, ॲड.चंद्रशेखर पोरे, रमेश जाधव सर, मनोज लांबोरे, अथर्व लांबोरे, प्रवीण देशपांडे, दीपक देशपांडे काका, भानुदास शिंदे सर, अकबर आतार हुसेन तांबोळी, समाधान नवगिरे, दत्ता शेटे, कडी सर, श्याम देशपांडे, देवल काका, राजू पेंटर, राठोड काका, पांडूरंग जानकर, ज्ञानेश्वर चोरमुले साहेब, लखन आदमाने, ओंकार कापसे गुरुजी, रमेश मोरे साहेब,  लखन भोंडवे, शिवाजी खडतरे, हरिश्चंद्र कवडे काका व यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. लिमये मॅडम, प्रियांका कवडे, सौदागर मॅडम, जानकर काकू, देवल काकू, चुंबळकर काकू, कुलकर्णी काकू, तब्बू शेख, रूपाली  शेटे, जुबर तांबोळी इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)