एकूण आठ वाळू माफियांना एक वर्षासाठी केले तडीपार
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील वाळू माफीया यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अनुसार खालील नमूद वाळूमाफियांना सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे खालील प्रमाणे हद्दपार टोळीतील - १) पंकज पांडूरंग कोळेकर वय ३३ वर्षे, २) हिंमत अनिल कोळेकर वय ३० वर्षे, ३) विनोद अर्जुन कोळेकर वय ३५ वर्षे, ४) संतोष दगडू चव्हाण वय ४६ वर्षे, अ.क्र. १ ते ४ रा. कोळेकर वस्ती गुरसाळे ता. पंढरपूर, ५) आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे वय २८ वर्षे, रा. देगाव ता. पंढरपूर, ६) धनाजी रामचंद्र शिरतोडे वय ३४ वर्षे रा. गुरसाळे ता. पंढरपूर, ७) महेश दिगंबर शिंदे वय २८ वर्षे सहयाद्री नगर इसबावी ता. पंढरपूर, ८) सोमनाथ अरुण लोंढे वय ३४ वर्षे रा. कौठाळी ता. पंढरपूर
असे एकूण आठ वाळूमाफियांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. यांच्याविरुद्ध वाळू चोरीचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल होते त्या अनुषंगाने वरील आठ व्यक्तींना पंढरपूर तालुका पोलिसांनी आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांची सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पुणे सातारा सांगली या जिल्ह्यात तेथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोडून तडीपाडीच्या अंमलबजावणी केलेली आहे. सदर तडीपार केलेल्या आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मारामारीचे वाळू चोरीचे सरकारी कामात अडथळा आणल्याचे धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजू गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक आबा शेंडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल घंटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद, पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर गवळी, पोलीस हवालदार मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ, घाडगे, चाटे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

