बाजार समितीमध्ये भविष्यात विविध अत्याधुनिक सुविधा केल्या जाणार..- मा. आ. प्रशांत परिचारक.

0
पंढरपूर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आगामी काळात विविध अत्याधुनिक सुविधा केल्या जाणार आहेत.सुदैवाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यासाठी सहयोग देतील, असे प्रतिपादन माजी आमदार  प्रशांत परिचारक यांनी केले.. 
पंढरपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होणार असून परिचारक गटाच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडी पॅनलची बाभुळगाव येथे जाहीर प्रचार सभा झाली.यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार श्री. प्रशांत परिचारक म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.पण विरोधकांना तालुक्याचा नेता व्हायचे असल्याने, त्यांनी तडजोडीची तयारी न दाखविता निवडणुक लावली, पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीतही अपशकून करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.
अशी टीका करून त्यांनी बाजार समितीची मागील गेल्या ३० वर्षातील वाढती प्रगतीची कमान सांगितली. ते म्हणाले ही निवडणूक गावातील लोकांची आहे, चांगले, वाईट त्यांना कळते. राजकारण हे प्रवाही असल पाहिजे. राजकारणात नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व तयार झाले पाहिजे, म्हणूनच अर्बन बँकेत नवा चेअरमन आणला. सहकारी संस्था चांगल्या लोकांच्या ताब्यात देणे महत्वाचे आहे. केंद्रीय सहकारी मंत्री अमित शहा असल्याने भविष्यात विविध सुधारणा बाजार समितीमध्ये केल्या जातील. या बाजार समितीला ७५ वर्ष पूर्ण झाली असून खरे काम १९४९ पासून सुरू झाले.१९९० साली प्रथम निवडणूक झाली. ही सहावी निवडणुक असून अनेकदा बिनविरोध झाली होती.
सुरुवातीला अतिशय कमी उलाढाल होती. डाळींब आणि बेदाण्याच्या मार्केट मुळे आता ४८० कोटींची उलाढाल होत आहे.पण हा नफा मिळविण्याचा मार्ग नव्हे ही शेतकऱ्यांची संस्था आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शेतकऱ्याला उभे राहण्याचा अधिकार मिळाला आहे..
भविष्यकाळात सोलर सिस्टीम, अंडर ग्राउंड द्रेनेज, कोल्ड स्टोरेज, कांदा चाळ आदी कामे केली जातील असे ते म्हणाले. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, दाजी भुसनर, वकील सुभाष माने, लक्ष्मण धनवडे, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन कैलास खुळे, संचालक श्री किसन सरवदे, भास्कर कसंगावडे, प्रशांत देशमुख, दिलीप आप्पा घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेस परिसरतील ४० गावातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)