नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केली भाजप व परिचारक यांच्यावर सडकून टीका

0
सत्तांतर नाट्य कसे घडले याची केली पोलखोल
          पंढरपूर (प्रतिनिधी) - नुकतेच नगरपालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल जाहीर झाले, पंढरपूर न. पा. निवडणुकीत येथील प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार अक्षय गंगेकर यांनी भरघोस ८७१ मतांनी ही निवडणूक जिंकली. 
          यावेळी पुढील काळातील विकासाचे व्हिजन कसे असणार याची माहिती देत असताना गंगेकर यांनी सत्ताधारी भाजप आणि परिचारक पार्टीने कसा त्रास दिला याची माहिती देत परिचारक यांच्या कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली.
           ते म्हणाले २०१४ आणि २०१६ साली गंगेकर कुटुंबामुळेच परिचारक यांची सत्ता आली होती, २०११ साली उमेश पवार, धनु कोताळकर व आमचे वडील प्रताप गंगेकर निवडून आले होते, २०१४ साली स्व. आमदार भारत भालके यांनी यांचा सुपडा साफ केला होता, काही चुकीच्या गोष्टी घडल्या, तेव्हा सत्तांतर करण्यासाठी काही लोकांनी आमच्या वडिलांचे पाय धरले, तेव्हा हे रडत होते. आमच्यामुळेच तेव्हा परिचारक यांची सत्ता आली होती, आणि आज २०२५ साली देखील भालके, गंगेकर यांच्यामुळे सत्तांतर घडले आहे,
             यावेळी ८७१ मते पडली, अजून मत पडली असती पण काही समाजाला टारगेट करण्याचा प्रयत्न केला, राज्यात, केंद्रात यांची सत्ता असल्याने व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून जाणीवपूर्वक मोठा त्रास दिला, प्रचार करू दिला नाही, प्रभाग क्रमांक तीन आणि तेरा मध्ये मला आणि नागेश भोसले यांना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, यांचे २४ नगरसेवक कसे निवडून आले, आणि मग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कशा पराभूत झाल्या, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
पुढील काळात नगराध्यक्षा प्रणिता भालके व आम्ही मिळून विकासाची व्यापक दृष्टी ठेवून चांगले काम करू.
          नगरसेवक अक्षय गंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानले. व जनतेच्या सुख-दुःखात कायम पाठीशी राहण्याचे आश्वासनही दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)