विरोधकांकडून काळया पाशाणावर धडक मारुन डोके फोडून घेण्याचा प्रयत्न
पंढरपूर / प्रतिनीधी -   पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवारातील महत्वाची संस्था असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. यामध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करीत विरोधकांनी विठ्ठलच्या निवडणुकीप्रमाणे या सभासदांचीही दिशाभुल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे परंतू, हा सभासद स्व.वसंतदादा काळे यांनी जोपासलेल्या परिवरातील आहे त्यामुळे हा परिवार कल्याणरावांची साथ कदापीही सोडणार नाही असे जाहीर मत संचालक सुधाकर कवडे यांनी व्यक्त  केले आहे.
            पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे कल्याणराव काळे यांच्या वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल परिवाराचे नेते गणेश पाटील, युवा नेते समाधानदादा काळे यांचेसह विठ्ठल परिवारातील नेते उपस्थित होते.
            पुढे बोलताना कवडे म्हणाले सध्या विरोधकांकडून विरोधासाठी विरोध म्हणून निवडणुक लावण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न म्हणजे काळया पाशाणावर धडक मारणारा आहे. यामुळे पाशाणाला कोणतीही इजा पोहचत नसून केवळ स्वत:ची डोकेफुटी होणार आहे एवढेच या निवडणुकीतून निष्पन्न होणार आहे असेही कवडे यांनी सांगीतले. स्व.वसंतदादांनी राजकारणाच्या प्रवाहात नसताना झोपलेली माणसे होती त्यांना जागे करुन नवीन वर्ग राजकीय प्रवाहात आणला आहे. तोच प्रवाह नव्या उमेदीने उभा केला आहे. तोच परिवार आज कल्याणराव काळे यांच्यासाठी जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही कवडे यांनी व्यक्त केला.
            सध्या विरोधकांकडून साम, दाम, दंड व भेद या नितीचा वापर करुन समोरच्या माणसांना चुकीची माहिती देवून भ्रमिष्ट करायचे त्यातून लोकांची फसगत करायची. हा धंदा बंद करावा असे सांगत आता चेअरमन अभिजीत पाटील यांनी आकडेवारीतून भाषण देण्याचे सध्या बंद केल्याचे जाणवत आहे. विठ्ठलच्या निवडणुकीत प्रती टन ऊस गाळपातून कधी उत्पादन व किती खर्च याचा लेखा जोखा मांडत आपण प्रती टन ऊसास रु.3500 रु देवू शकतो हे आकडेवारीतून आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाने बळी पडत सभासदांनी विठ्ठलच्या निवडणुकीत तुम्हाला विजयी केले आहे तर आपण रु.2500/- भाव दिला असला तरी उर्वरीत रु.1000/- गेले कुठे असा सवालही कवडे यांनी केला आहे. विठ्ठलच्या निवडणुकीत दही नासवताना राजकारण नासवले त्याचेच बक्षिस म्हणून विरोधकांची झालेली मिलीभगत असल्याचा टोलाही दिपक पवार यांच्यावर लगावला आहे.
            यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, ॲड.गणेश दादा पाटील, ज्ञानेश्वर जवळेकर, समाधान फाटे, नितिन बागल, समाधान दादा काळे, हणमंत दांडगे आदींची भाषणे झाली. यावेळी सुभाष जगदाळे, आण्णा शिंदे,राजाराम पाटील, दिलीप कोळी, शहाजी साळूंखे, महादेव देठे, शंकर कवडे, जयसिंह देशमुख, तानाजी जाधव, पोटट गाजरे, प्रदीप निर्मळ, सुभाष हुंगे, भास्कर भोसले, पांडूरंग मोरे, पांडूरंग भोसले, सिध्देश्वर मोरे, भारत माने, ज्ञानेश्वर घाडगे, नागेश मोरे, अनिल गायकवाड, बाळु माने, दादा ढोले, बिभिषण अनपट, तानाजी शिंदे, निशाल शिंदे, हणमंत भोसले, श्रीरंग कोळी, विकास पवार, सिध्देश्वर पवार, धनाजी चौगुले,  यांचेसह सहकार शिरोमणीचे आजी माजी संचालक, यशवंत पतसंस्थेचे संचालक, विठ्ठलचे माजी संचालक यांचेसह विठ्ठल परिवारातील  कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.  
विठ्ठल मधील चिंतनाने आम्ही एकत्र-ॲड.गणेश पाटील
श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही एकमेकाशी भांडत बसल्याने पराभव झाला. याचेच चिंतन आम्ही सर्वांनी केले आहे. यामुळे भगिरथ भालके, युवराज पाटील, कल्याणराव काळे, आम्ही सर्वजण एकत्र आलो असून या पुढील सर्व निवडणुकांत एकत्रितच दिसणार असल्याचे ॲड.गणेश पाटील यांनी सांगीतले. सहकार शिरोमणीने 3 लाख गाळप करुन  50 कोटी पर्यंतचे कर्ज परतफेड केली आहे. तशी आपण विठठलवर 7 लाखाचे गाळप करुन किती कर्जाची परतफेड केली याचा खुलासा करावा असेही पाटील यांनी विरोधकांना विचारले आहे.

