पंढरपूरकरांच्या प्रतिसादामुळे भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश

0
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी लवाजमासह घेतले  विठुरायाचे  दर्शन
      पंढरपूर (प्रतिनीधी) - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज आपल्या अख्या मंत्रीमंडळासह - पंढरीत येवून भक्ती आणि त्याचबरोबर राजकीय शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूरात सकाळी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत काही मंत्री उपस्थित होते.
    सरकोलीतील शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.

यावेळी ते म्हणाले, मागच्या निवडणूकीत पंढरपूरकरांनी मतदानरुपी आशिर्वाद दिले.परंतु पराभव झाला पण काम थांबविलं नाही. इच्छा शक्ती असणाऱ्याला पंढरपूरकर प्रतिसाद देतात काम करणाऱ्याला अहमदाबादपेक्षा हैद्राबाद जवळ आहे म्हणून आम्ही वडिलधारी मंडळींच्या सल्ल्यानंतर बीआरएस पक्षात प्रवेश करीत आहोत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)