नरेंद्र मोदींचा काळ हा सुवर्णकाळ - प्रशांत परिचारक

0

सांगोला (प्रतिनिधी ): भारतीय जनता पार्टी जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. आता आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे सरकार आणण्याचा निर्धार  देशवासीयांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत गेल्या पाहिजेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याची त्यांना जाणीव करून द्यावी म्हणून प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ९ वर्षाचा काळ हा सुवर्णकाळ असल्याचे मत माढा लोकसभा निवडणुक प्रमुख तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात महाजनसंपर्क मोदी  राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी ता. पंढरपूर येथे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रशांत परिचारक बोलत होते.
यावेळी भाजपचे सांगोला विधानसभा निवडणुक प्रमुख तथा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, पंढरपूर तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, भगवानराव चौगुले, माऊली हळणवर, दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, वसंतराव देशमुख, हरीषदादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, डॉ. अनिल कांबळे, दिलीप सावंत, नवनाथ पवार, राजाभाऊ जगदाळे, मधुकर साळुंखे, राजू गावडे, प्रशांत देशमुख, अरुण घोलप, बाळासाहेब यलमार, गंगामामा विभुते, सुभाष मस्के, अक्षय वाडकर, सुनील भोसले, यांच्यासह भाळवणी विभागातील सर्वच गावचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)