तालुक्याच्या सर्वांगीण विकासात कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे मोठे योगदान : प्रणव परिचारक

0
भाळवणी येथे मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिर
भाळवणी ता. पंढरपूर (प्रतिनिधी) - स्व. सुधाकरपंत परिचारक आपल्यातून गेले असले तरी त्यांचे कार्य नेहमीच आपल्या स्मरणात राहील. त्यांच्या प्रेरणेनेच पांडुरंग परिवाराचे सामाजिक कार्य पुढे सुरू आहे. त्यांचे विचार आपण पुढे चालविणे गरजेचे असून पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे मोठे योगदान असल्याचे मत युवक नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले. 

       भाळवणी येथे स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रणव परिचारक युवा आघाडी व पांडुरंग परिवार यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत नेत्र तपासणी व लेन्स बसविणे आरोग्य शिबिराचे   आयोजन करण्यात आले होते. तसेच या शिबिर अंतर्गत आधार कार्ड दुरुस्ती, भारत आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी केसकर व प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले यांनी केले. 
    सदर शिबिरामध्ये भाळवणी परिसरातील 435 रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यापैकी 175 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 100 रुग्णाच्या डोळ्याचे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे. यावेळी बहुसंख्य नागरिकांना आधार कार्ड दुरुस्ती व नवीन अधार कार्ड देण्यात आली.
    यावेळी भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, बाळासाहेब यालमर, दीपक गवळी, सुनील पाटील, हणमंत केसकर, आप्पा मासाळ, पोपट देठे, आबा शेंडगे, रघुनाथ झांबरे, कुंडलिक सातपुते, सुधाकर भिंगे, भारत गोफने, सरपंच राजकुमार पाटील, रणजीत जाधव, स्वप्नील दानोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बंडोपंत गुरव यांनी केले तर स्वागत व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तमिम इनामदार, हरिभाऊ चौगुले, अक्षय वाडकर, विजय राजमाने, अतुल गवळी व प्रणव परिचारक युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)