पंढरपूर (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधामुळे जनतेच्या सण उत्सवामध्ये गोडवा निर्माण झाला आहे. यातूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून जनतेच्या सुख दुखाची व राज्याच्या विकासाची भुमिका मांडली जात असल्याचे शिवसेना युवा सेनेचे तालुकाप्रमुख महादेव भोसले यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे स्वस्त धान्य दुकानच्या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे वाटप करताना महादेव भोसले संवाद साधत होते. यावेळी शिवसेनेचे विजय करपे, पोपट कदम, सर्जेराव पाटील, ग्र.प.सदस्य अनिल कदम, सिध्देश्वर भोसले, विष्णु खरे, मारूती पाटोळे , अनिल जाधव, संजय रितोंड, बळीराम लोखंडे, बाळासाहेब गणगे, सोसायटी चेअरमन जगन्नाथ माने, माजी चेअरमन वामन कदम, शंकर कदम, लक्ष्मण माळी , रमाकांत गव्हाणे, रोहन बिस्कीटे, धीरज भोसले, रमेश बिस्कीटे, आनंद बिस्कीटे, सचिन बिस्कीटे, शरद साळवी, विलास काकडे, समाधान कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.
पुढे बोलताना युवासेना तालुकाप्रमुख महादेव भोसले म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारातून आणि आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यामध्ये जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. याचा लाभ गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे. याचाच एक भाग म्हणून लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचवण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याचे भोसले यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी योग्य वेळी आंनदाचा शिधा मिळाल्यामुळे सणामध्ये गोडधोड करता येईल असे समाधान व्यक्त करून यासाठी युवासेनेच्या माध्यमातून होणार्या प्रयत्नांचे कौतुक केले.

