सांगोला लायन्सकडून अभियंत्यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान

0
सन्मान कर्तृत्वाचा गौरव  अभियंत्यांचा

        सांगोला (प्रतिनिधी) - जागतिक पातळीवर विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये वेगवान बदल घडत आहे. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. देशाच्या विकासाला अभियंत्यांची गरज आहे. आपल्या राष्ट्राची प्रगती व विकास अभियंत्यांच्या प्रतिभावान बुध्दी शिवाय शक्य नाही. हा विचार प्रमाण मानून   'अभियंता दिनाच्या' निमित्ताने माजी प्रांतपाल प्रा.ला. प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब सांगोला कडून 'सन्मान कर्तृत्वाचा गौरव अभियंत्यांचा' या कार्यक्रमाअंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे  सांगोला शहरातील   इंजि.मधुकर कांबळे, इंजि.मिलिंद ठोंबरे, इंजि.विलास बिले, इंजि.रमेश जाधव, इंजि.आकाश गोडसे  या  अभियंत्यांचा  उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन्स प्रांत ३२३४ड१ माजी प्रांतपाल ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य गंगाधर घोंगडे  उपस्थित होते.
          या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ला.उन्मेश  आटपाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन ला.सौ.शैलजा  झपके यांनी केले तर आभार प्रदर्शन ला.सुनील भोरे यांनी केले.
--------------------------------------------------
  लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून अभियंता दिनाचे औचित्याने  पहिल्यांदाच माझा उल्लेखनीय कार्यासाठी   सन्मान होतो आहे.व हा  सन्मान  माझे आदर्श, गुरुवर्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे हस्ते होतो आहे. याचा मला विशेष आनंद आहे. सांगोला शहरांमध्ये ३३ वर्षे बांधकाम  क्षेत्रामध्ये कार्य करत आहे.यापुढेही लोकहिताचे कार्य करण्याचा मानस आहे..
 इंजि.मधुकर कांबळे
--------------------------------------------------
 प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखालील  सांगोला विद्यामंदिरमध्ये आजही भरतीसाठी एक रुपयाही घेतला जात नाही.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विशेष प्रयत्न केले जातात. याचा या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मला  विशेष अभिमान आहे. झपके सर नेहमी विविध संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या कार्याचे  कौतुक करतात, अनेकांना संधी देतात. तोच विचार प्रमाण  त्यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबने आज अभियंत्यांचा केलेला सन्मान महत्वपूर्ण आहे..
इंजि.मिलिंद ठोंबरे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)