सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचा पंढरपुर येथे सन्मान सोहळा

0
भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस व वाचन प्रेरणा दिनानिमित्त विक्रेत्यांचा सन्मान
         पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न सोलापूर जिल्हा वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघटनेचा 15 ऑक्टोंबर भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दै. तरुण भारत संवाद सोलापूर वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान सोमवार 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी अकरा वाजता योग भवन एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे पंढरपूर येथे आयोजित केला असल्याचे सोलापूर आवृत्तीप्रमुख विजय देशपांडे यांनी सांगितले.
      सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेशजी परिचारक राहतील तर  आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते विक्रेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे विनोद पोतदार यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, सोलापूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा मेढेकर, सचिव बंटी बाबर, संघटक श्याम थोरात पंढरपूर, शहराध्यक्ष महेश पटवर्धन, सांगोला तालुकाध्यक्ष रविराज शेटे, संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, कार्याध्यक्ष अरुण कोरे, खजिनदार उत्तम चौगुले, सदस्य अशोक खरात तसेच सर्व तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन  दै तरुण भारत संवाद सोलापूर टीमचे वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)