पंढरपूर (प्रतिनिधी) - वारकरी भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेस श्रीमती बाई लिंबा वाघे (रा. बेंबळी जिल्हा धाराशिव) येथील भाविकांनी श्रीविठ्ठलास 255 ग्रॅम वजनाचा सोन्याचा करदोडा व श्री रूक्मिणी मातेस 19 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आजरोजी श्रीरूक्मिणी पांडुरंग चरणी अर्पण केले. त्याची अंदाजित रक्कम रु 1799399/- आहे.
देणगीदार यांचा सत्कार आस्थापना विभाग प्रमुख श्री विनोद पाटील यांचे हस्ते भाविकांना साडी उपरणे तसेच श्रीविठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समितीचे सराफ व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

