पुणे (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावतीने अलिबाग येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांना महाराष्ट्र शासनाचे माजी कृषी संचालक डॉक्टर  पांडुरंग वाठारकर, प्रसिद्ध उद्योजक रामदास माने डॉक्टर मंगेश देशमुख यांच्या शुभहस्ते. पुणे नाना पेठ येथील पत्रकार भवनात देण्यात आली.
          यशवंती प्रेरणादायी सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचन चळवळीचे प्रणेते अनंत कदम, प्राध्यापक दिपक पाटील उपस्थित होते. प्राध्यापक जयपाल पाटील यांनी देशभरात आपत्ती सुरक्षेचे आतापर्यंत 517 प्रत्यक्ष व्याख्याने व आकाशवाणी मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून लाखो नागरिकांना सुरक्षेचे धडे दिले आहेत. जागतिक आपत्ती परिषद ४थी मुंबई येथे दोन चाकी अपघात संबंधीजागतिक आपत्ती परिषद ५ वी दिल्ली येथे कोविड नंतर काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे भारतातील आपत्ती व्यवस्थापन तज्ञांच्या राष्ट्रीय संमेलनात "जंगलातल्या आगी" यासंबंधी शोधनिबंध सादर केले आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर उत्तरांचल डेहराडून येथे होणाऱ्या ६व्या जागतिक परिषदेचे ते "समन्वयक" आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 804 ग्राम पंचायतीत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम त्यांच्या "रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे" सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे तज्ञ म्हणून महाराष्ट्रातील एकमेव जेष्ठ पत्रकार   त्याचबरोबर ते कवी, साहित्यिक असून महाराष्ट्र शासनाचे प्राणी मित्र, आपदा मित्र व कृषी मित्र म्हणून काम करत आहेत. 
          छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट दिल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

