महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - इसबावी येथे महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळांचे ज्येष्ठ सभासद विजयदादा अधटराव व सुभाष अभंगराव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी इयत्ता १० तील ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या संदेश करकमकर, रणवीर कोळी, राधिका तारापूरकर, किरण जाधव, वैष्णवी संगितराव, मयुरी सर्जे, अक्षता अभंगराव, वैष्णवी कोळी, श्रृती शिंदे, राजनंदिनी परचंडे, श्रावणी बळवंतराव ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक कार्यकर्ते मधुकर आंबेकर, सोमनाथ अभंगराव, महादेव परचंडे, पुडलिंक परचंडे यांचा व मंडळाचे पदाधिकारी अनिल अभंगराव यांची पर्यवेक्षकपदी व सौ शशिकला परचंडे यांना  मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याबदद्ल मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष शंकर माने, सचिव चंद्रकांत परचंडे, सुरेश शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी तर अनिल अभंगराव, राधिका तारापूरकर या विद्यार्थिनीने व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अभंगराव यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले, कार्यक्रमास अशोक ननवरे, रामचंद्र खडाखडे, दिलीप कोताळकर, दत्तात्रय बळवंतराव, तानाजी कोळी, सुकदेव अधटराव आदी कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)