कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी तर अनिल अभंगराव, राधिका तारापूरकर या विद्यार्थिनीने व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अभंगराव यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले, कार्यक्रमास अशोक ननवरे, रामचंद्र खडाखडे, दिलीप कोताळकर, दत्तात्रय बळवंतराव, तानाजी कोळी, सुकदेव अधटराव आदी कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते
महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Monday, November 06, 2023
0
पंढरपूर (प्रतिनिधी) - इसबावी येथे महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळांचे ज्येष्ठ सभासद विजयदादा अधटराव व सुभाष अभंगराव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी इयत्ता १० तील ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या संदेश करकमकर, रणवीर कोळी, राधिका तारापूरकर, किरण जाधव, वैष्णवी संगितराव, मयुरी सर्जे, अक्षता अभंगराव, वैष्णवी कोळी, श्रृती शिंदे, राजनंदिनी परचंडे, श्रावणी बळवंतराव ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक कार्यकर्ते मधुकर आंबेकर, सोमनाथ अभंगराव, महादेव परचंडे, पुडलिंक परचंडे यांचा व मंडळाचे पदाधिकारी अनिल अभंगराव यांची पर्यवेक्षकपदी व सौ शशिकला परचंडे यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याबदद्ल मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष शंकर माने, सचिव चंद्रकांत परचंडे, सुरेश शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
Tags

