पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याबाबतची मागणी शासन दरबारी पडून आहे. आमच्या या रास्त मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था पाहता असंख्य विद्यार्थी केवळ फी भरू शकत नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे कठीण झाले आहे. तसेच उद्योग व्यवसायासाठो आर्थिक विकास महामंडळाची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा शासनाकडून आर्थिक निकषावर सर्वेक्षणदेखील झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत विधिमंडळात मागणीही केली आहे. परंतु आजतागायत आमची ही मागणी प्रलंबितच आहे.
आज पर्यंत राज्यात ब्राह्मण समाजाच्या अनेक श्रेष्ठ मंडळींनी संबंधित भेटी घेऊन शासनाला वारंवार यासंबंधी निवेदन देण्यात आलेली आहेत. धरणे, मोर्च, आंदोलने, संवाद बैठकाही झाल्या आहेत. यातून काहीही निष्पन्न न झाल्यामुळे दि.28 नोव्हेंबर 2023 पासून जालना येथे आमचे समाजबांधव श्री. दीपक भाऊ रणनवरे हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे, तरीही शासन आमच्या रास्त मागणीची दखल घेत नाही. ही फार गंभीर बाब आहे.
तरी शासनाने त्वरित भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून त्यास भरीव निधीची उपलब्धता करून द्यावी अशा आशयाचे निवेदन आज रोजी पेशवा युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेबांना देण्यात आले.

