श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
         पंढरपूर (प्रतिनिधी) - दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूर शहरातून श्रीराम उत्सव समिती व समस्त हिंदू समाज यांनी आयोजित केलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळातर्फे "प्रभू श्रीराम राज्याभिषेक सोहळा" हा जिवंत देखावा सादर केला गेला होता. या मध्ये शहरातील 19 बालकलाकारांनी सहभाग घेतलेला होता.
          सहभागी झालेल्या सर्व बाल कलाकारांना श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळातर्फे आज काळा मारुती जवळील श्री विठ्ठल मंदिर येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. 
        यामध्ये सर्वश्री सचिन अनवलीकर, सुमित पारखे, गजानन धाराशिवकर, प्रणव नाझरकर, दीपाली सतपाल कांबळे, लक्ष्मी बडवे उपस्थित होते..

