सांगोला (प्रतिनिधी) - द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ड१ रिजन १ विभागीय परिषदेमध्ये रिजनमधील क्लब अध्यक्ष वक्तृत्व स्पर्धेत लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी प्रांतपाल ला. भोजराज नाईक-निंबाळकर यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन ला.उन्मेष आटपाडीकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रथम उपप्रांतपाल ला.ॲड एम.के.पाटील द्वितीय उपप्रांतपाल ला.डॉ.विरेंद्र चिखले विभागीय परिषद चेअरमन, ला.अशोक मेहता, रिजन चेअरमन ला.राजेंद्र कासवा, माजी प्रांतपाल ला.राजशेखर कापसे,रिजन सेक्रेटरी ला.गोविंदप्रसाद लाहोटी, परिषद सचिव ला.ॲड अमिता कारंडे व पदाधिकारी उपस्थित होते.
दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर येथील वैष्णवी साई फार्म या निसर्गरम्य ठिकाणी प्रांतातील सर्व पदाधिकारी, रिजन १ मधील लायन सदस्य यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल लहाने यांचे विजीगिषू प्रेरणा देणारे व्याख्यान, लायन्स क्विज, बॅनर प्रेझेंटेशन, पुरस्कार वितरण, हुरडा पार्टी आदि कार्यक्रमाने अनेकांचा आनंद द्विगुणित झाला.
या यशाबद्दल विभागीय परिषदेसाठी उपस्थित लायन्स क्लब ऑफ सांगोला मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, कॅबिनेट ऑफिसर सी.ए.ला.उत्तम बनकर, झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, क्लब द्वितीय उपाध्यक्ष इंजिनिअर ला.हरिदास कांबळे, जीएसटी चेअरमन ला.अमोल महिमकर, सदस्य ला.सौ.सुमन कांबळे, ला. प्रा.शिवशंकर तटाळे, ला.राजेंद्र ढोले, ला.काकासाहेब नरूटे व लायन्स क्लब ऑफ सांगोला सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.
--------------------------------------------------
दरवर्षी संपन्न होणाऱ्या विभागीय परिषदेमध्ये अध्यक्षांच्या वक्तृत्व स्पर्धेत सन २०२१-२२ व सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता.व यावर्षी विद्यमान क्लब अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याने लायन्स क्लब सांगोलाने अध्यक्षांच्या वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रिक साधली आहे.
--------------------------------------------------

