याप्रसंगी बोलताना हरीष ताठे यांनी जय महाराष्ट्र युवा मंचच्या कार्याचे कौतुक केले. तसेच शिवरायांविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच मा. तहसीलदार श्री. किशोर बडवे साहेब यांच्या हस्ते उपस्थिताना तसेच शिवप्रेमींना किशोर बडवे यांच्या हस्ते चहा वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम जय महाराष्ट्र युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांच्या उपस्थितीत नियोजनबद्ध पार पडला. याप्रसंगी समाजसेवक मुकुंद महाराज बडवे, प्रथमेश बारसकर, सोहम व्होरा, नागेश शिरसागर, नारायण कासार आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.

