डॉ. शर्वांणी काणे यांचा वैद्यकीय परिसंवाद तर डॉ. संगीता पाटील यांचेकडून विद्यार्थिंनींची आरोग्य तपासणी.
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे मध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. यामध्ये डॉ. शर्वांणी काणे यांचे “स्त्री आणि आरोग्य” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तर डॉ. संगीता पाटील यांचेकडून महाविद्यालयातील विद्यार्थिनिंची आरोग्य तापासणी करण्यात आली. सदरच्या दोन्ही उपक्रमाचा विद्यार्थींनीना मोठा फायदा झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली.
वैद्यकीय परिसंवादामध्ये बोलताना डॉ. शर्वांणी काणे म्हणल्या की, आयुष्य जगत असताना स्त्रियांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतात, तसेच प्रत्येक स्त्रीला विविध भूमिकेतून जावे लागते. अश्या वेळी महिला आपल्या शरीरीक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच जेवढे शारीरिक आरोग्य महत्वाचे, तेवढेच मानसिक आरोग्य ही महत्वाचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थिंनींच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले.
डॉ. संगीता पाटील यांनी विद्यार्थिंनींची रक्तामधील थायरॉइड कैल्शिअम आणी हीमोग्लोबिन अश्या विविध तपासण्या करून विद्यार्थिंनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या शिबिरामद्धे सुमारे 200 विद्यार्थिंनिंची आरोग्य तपासणी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे वैद्यकीय परिसंवाचे आयोजन अरण्यात आले होते. प्रा. प्रियांका कुलकर्णी यांनी यासाठी समन्वयक म्हणुन काम पाहिले. तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातर्फे आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दीप्ती कुलकर्णी यानी या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणुन काम पाहिले.तसेच प्रा. आर. जे. भोसले, प्रा. विजय मदने, प्रा. पूनम लवटे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कू. साक्षी भिंगे, प्रतिक्षा शिंदे, श्रुती ठाकरे या विद्यर्थिनिनी सुत्रसंचालन केले.
सदर उपक्रमाला श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी. कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस. एम. लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. संजीवनी बबलसुरे या विद्यार्थिनीनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

