उमेदवारांचे भविष्य गुलदस्तात बंद...
पंढरपूर (प्रतिनिधी) - 252- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील 357 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 68.97 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे, मनसेचे दिलीप बापू धोत्रे तर महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल सावंत या उमेदवारांची चौरंगी लढत पाहवयास मिळाली.आज मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात जनतेनी उस्फुर्त प्रतिसाद देत मतदान हक्क बजावला.
आज झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार असुन या लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत कोण बाजी मारणार आहे हे लवकरच कळेल. परंतु जनतेत मात्र ठिकठिकाणी राजकीय चर्चा होत असताना पाहवयास मिळत आहे. तसेच कार्यकर्त्यांमधून पैदा ही लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

