मतदार जनजागृती अभियान
पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत व रा.प.पंढरपूर आगार यांचे तर्फे विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदार जनजागृती अभियान हा उपक्रम बसस्थानकावर घेण्यात आला.
यावेळी आगार प्रमुख अंकुश सरगर, वाहतूक नियंत्रक मोहन शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. यावेळी सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. तसेच बस स्थानकावर चौकशी कक्ष, आगाऊ तिकीट विक्री विभाग, पेपर विक्री स्टॉल, त्याचबरोबर खाजगी आस्थापना इ.ठिकणी मतदान जागृतीचे पोस्टर्स लावण्यात आली.

