सिद्धेश्वर मंदिर माचनूर येथून प्रचाराचा शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भालके भगीरथ भारत यांची जाहीर सभा व प्रचाराचा शुभारंभ, खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून सिद्धेश्वर मंदिर माचनूर येथून होणार आहे.
"हुंकार निष्ठेचा,
हा प्रारंभ नव्हे प्रचाराचा,
हा आरंभ आहे परिवर्तनाचा"
....असा संदेश देत उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सिद्धेश्वर मंदिर माचनूर येथे जाहीर सभा व प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व भालके कुटुंबावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

