श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सुरेल मैफिल सप्तसुरांची उधळण

0
सुशील कुलकर्णी प्रस्तुत गुढीपाडवा निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात सुरेल मैफिलीने

           पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गुढीपाडवा या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुशिल कुलकर्णी प्रस्तुत मैफिल सप्तसुरांची सुरेल कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला व्यवस्थापक मनोज श्रोत्री आणि सह कलाकार यांचे शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले 
         गायिका योगिनी ताठे, स्वराली सावळे, गायक आप्पासाहेब चुंबळकर, प्रसाद खिस्ते व श्रीकांत कुलकर्णी आणि सुशील कुलकर्णी यांच्या सहभागाने कार्यक्रमांस सुरुवात झाली. सुरुवातीला पंचतुंड नलरुंड मालधर या नांदीने सुरेल सुरुवात होत आम्हीं विठ्ठलाचे वारकरी, देव देव्हाऱ्यात नाही, मी विकत घेतला शाम, थकले रे नंदलाला, माझे जीवन गाणे, पद्मनाभा नारायणा, झिनी झिनी वाजे बिन, मि तर जाते जत्रेला, अशा अनेक मराठी भावगीते भक्तिगीते विविध गाण्यांनी पंढरपूरकरांना मंत्रमुग्ध करत मराठी वर्षारंभाला सुंदर स्वरांची मेजवानी दिली. त्यांना‌ तितकीच सुंदर साथसंगत तबला सुशील कुलकर्णी, हार्मोनियम आप्पासाहेब चुंबळकर, टाळ नंदकुमार कानडे यांनी करत संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ऋतुजा फुलकर यांनी करत कार्यक्रमाला आगळीवेगळी उंची निर्माण केली. यावेळी पंढरपूर नगरीतील अनेक संगीत कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेच कार्यक्रम सातत्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी सादर करत सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी विनंती रसिकांच्या वतीने करण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)