सांगोला (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली समाजाच्या अभ्युदयासाठी विविध प्रकारे कार्य सुरू आहे. त्यामध्ये मानवी मूल्ये व मानवाच्या गरजा जपण्याचे कार्य प्रयत्नपूर्वक केलेले आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने आखून दिलेल्या कार्यक्रमापैकी रक्तदान शिबिर, हृदयरोग तपासणी, वुमन मेनोपॉज, हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, मधुमेह तपासणी शिबिर, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, भुकेल्याला भोजन व युवकांना प्रेरित करण्यासाठीचे विविध कार्यक्रम प्रमाण मानून नाशिक येथे संपन्न झालेल्या ३२३४ बहुप्रांत परिषदेमध्ये मानवतावादी गरजांच्या पूर्ततेसाठी सांगोला लायन्स क्लबचा हिरो अवार्डने सन्मान झाला.
बहुप्रांताचे अध्यक्ष सुनील देसर्डा यांचे शुभहस्ते व बहुप्रांताचे उपाध्यक्ष ला.भोजराज नाईक -निंबाळकर, सचिव ला.बलबिर सिंग यांच्या उपस्थितीत सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कॅबिनेट ऑफिसर ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, सदस्य ला.प्राचार्य अमोल गायकवाड, ला.प्रा. शिवशंकर तटाळे, ला.प्रा.डी.के. पाटील, ला.प्रा.मिलिंद देशमुख उपस्थित होते.

