मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक - प्रणव परिचारक

0
पंढरपूर शहरात 11वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
                पंढरपूर (प्रतिनिधी) -  पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय आणि उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणवजी परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्रीसंत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी 6.30 ते 8.00 या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
        सदर कार्यक्रमास युवक नेते प्रणव परिचारक,  सचिन इथापे प्रांताधिकारी, सचिन लंगोटे तहसीलदार, पंचायत समिती पंढरपूर कर्मचारी वृंद, पंढरपूर शहर पोलीस प्रशासनचे PSI श्री संजय मुळे , महिला PSI मोनिका खडके पाटील, PSI सुप्रिया रावण, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य धीरज कुमार बाड सर व त्यांचे प्राध्यापक वृंद,  पंढरपूर शहर भाजप अध्यक्ष लाला पानकर, भाजप प्रभारी अक्षय वाडकर, भाऊ टमटम, आकाश आरकिले हे उपस्थित होते.

           पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी डॉ.संजय देशपांडे, युवा ता.प्रभारी लखन पडळकर, योगशिक्षक मिलिंद वाईकर, गिरीश अडवलकर, पुरुष व महिला साधक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमापूजनाने झाली. सदर कार्यक्रमात जेष्ठ योग शिक्षक  सुधीर आडवळकर यांच्या प्रार्थनेने झाली व योगाचे प्रात्यक्षिके भारत स्वाभिमान सोलापूर जि.प्रभारी सुरेंद्र पिसे यांनी करून दाखविले व करून घेतले. तसेच योगशिक्षक सोलापूर जि.सोशल मीडिया प्रभारी मधुकर सुतार यांनी आसनाचे व प्राणायामाचे लाभ व फायदे आणि करताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबतची माहिती व मार्गदर्शन सहभागी साधकांना केले.
         युवा नेते प्रणवजी परिचारक व  तहसीलदार श्री सचिन लंगोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.. पतंजली समितीमार्फत सर्वांचे आभार मानून शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)