कार्याध्यक्षपदी विठ्ठल महाराज नामदास तर प्रदेशाध्यक्षपदी शाम महाराज उखळीकर
पंढरपूर (प्रतिनिधी) - वारकरी संप्रदायातील संतवाङमय तत्वाज्ञानानुसार कार्यरत असणारी वारकरी संप्रदाय पाईक संघ ही संस्था असून नुकत्याच या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या नुतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर, अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे व कार्याध्यक्ष ह.भ.प. चैतन्य महाराज देहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक ५ जुन रोजी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते वारकरी संप्रदायातील वैराग्यसंपन्न गंगुकाका शिरवळकर फडाचे मालक ह.भ.प.श्री. भागवत महाराज शिरवळकर यांची नुतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर नुतन कार्याध्यक्षपदी संत नामदेव महाराज यांचे विद्यमान वंशज ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज नामदास, तर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वै.विठोबा अण्णा उखळीकर दिंडीचे मालक ह.भ.प.श्री. शाम महाराज उखळीकर यांची निवड करण्यात आली. या सोबत दोन्ही कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदरच्या निवडी पुढीलप्रमाणे....
* राष्ट्रीय कार्यकारणी *
अध्यक्ष :- श्री.ह.भ.प.भागवत महाराज शिरवळकर, कार्याध्यक्ष :- श्री. ह.भ.प. विठ्ठल महाराज नामदास, उपाध्यक्ष (४):- श्री. ह.भ.प. स्वामी महाराज राशिनकर, श्री.ह.भ.प. विठ्ठल महाराज पैठणकर, श्री.ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री, श्री.ह.भ.प. भागवत महाराज हंडे, सचिवः- श्री.ह.भ.प. नागेश महाराज बागडे, सहसचिव :- श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तारे, खजिनदार :- श्री. ह.भ.प. भरत महाराज अलिबागकर , सह खजिनदार :- श्री.ह.भ.प. मयूर महाराज बडवे, राष्ट्रीय प्रवक्ते : श्री. ह.भ.प.सागर महाराज बेलापूरकर, सहप्रवक्ते :- श्री. ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य :- श्री ह.भ.प. देवव्रत(राणा) महाराज वासकर, श्री.ह.भ.प. रघुनाथ महाराज कबीर, श्री.ह.भ.प. चैतन्य महाराज देहूकर, श्री. ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे, श्री.ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, श्री. ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, श्री. ह.भ.प. चक्रीनाथ महाराज सिद्धरस, श्री.ह.भ.प. हरि (आबा) महाराज लबडे, श्री.ह.भ.प. श्रीरंग महाराज औसेकर.
*महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी*
अध्यक्ष : श्री. ह.भ.प. शाम महाराज उखळीकर, उपाध्यक्ष (२) : श्री. ह.भ.प.एकनाथ महाराज नामदास, श्री.ह.भ.प. नामदेव (काका)महाराज गिराम, सचिव : श्री.ह.भ.प.महेश महाराज भिवरे, सहसचिव :- श्री.ह.भ.प.गणेश महाराज पाथ्रुडकर, खजिनदार :- श्री.ह.भ.प. पद्मनाभ महाराज देवडीकर, सहखजिदार -श्री. ह.भ.प. माधव महाराज बडवे, प्रवक्ते :- श्री ह.भ.प.विश्वनाथ महाराज शशिनकर.
राज्य कार्यकारिणी सदस्य :- श्री.ह.भ.प. सचिन महाराज गोसावी, श्री.ह.भ.प.दादा महाराज पिंपळनेरकर, श्री.ह.भ.प.संजय महाराज सोनकर, श्री.ह.भ.प.गोपाळ महाराज पोफळे, श्री.ह.भ.प.मुरारी महाराज नामदास, श्री.ह.भ.प.श्रीहरि महाराज चवरे, श्री.ह.भ.प.भानुदास महाराज टेंबुकर.
सदर बैठक जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान मठ, पंढरपूर येथे पार पडली. वारकरी संप्रदायातून या सर्व निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

