नूतन डी.वाय.एस.पी. म्हणून प्रशांत डगळे होणार रुजू

0
पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली

             पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली झाली असून नूतन उप विभागीय पोलीस अधिकारी जागी प्रशांत डगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर या तालुक्याचा पदभार ते पाहत होते. गृह विभागाने बदलीचे आदेश जारी केले आहेत.
             यामुळे पंढरपूर तालुक्याला नवीन डी वाय एस पी मिळाले असून प्रशांत डगळे यांच्यासमोर तालुक्यातील वाळू तस्करी, अवैध दारू,. मावा, गुटखा वाहतूक, विक्री रोखण्याचे आव्हान असणार आहे, याप्रमाणेच पंढरपूर शहरातील गँगवॉर, भुरटी दादागिरी, महिला व मुलींची छेडछाड रोखण्याचे आव्हान असणार आहे.
            नूतन पोलीस अधिकारी कसा वचक बसवतील याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)