दहा लाख रुपयांची खंडणी घेताना तथाकथित कामगार नेते पोलिसांच्या ताब्यात

0


          पंढरपूर (प्रतिनिधी) - अनवली येथील किरणराज घोडके हा अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या कामगार नेत्याला दहा लाख रुपयाची खंडणी घेताना के.बी.पी. चौकातील नामांकित राधेश हॉटेलमध्ये पंढरपूर शहर पोलिसांनी रंगेहात पकडून गजाआड केल्याने संबंध जिल्ह्यातील कामगार चळवळीत खळबळ उडाली आहे.

          संबंधित माहिती अशी की, या कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांनी दोन वर्ष बंद पडलेला व शेतकरी सभासदांची देणे थकलेला श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना सत्ताधारी यांच्याकडून कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या ताब्यात घेऊन एक हाती सत्ता मिळवली. तो चांगल्या पद्धतीने चालवून दाखवला व सर्व सभासद ऊस बिले, ट्रॅक्टर मालक सेवानिवृत्त कामगार यांची सर्व थकीत देणे देऊन कारखाना सद्यस्थितीत चांगल्या प्रकारे चालत असताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास डाग लावण्याचे काम काही मंडळी आतून करत असल्याचे सर्वसामान्य सभासदांमधून बोलले जात आहे. मागील काही दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यात कामगार नेता म्हणून वावरणारा अनवली येथील किरण घोडके याचे डोळे चांगला चालत असलेल्या कारखान्याकडे बघून विस्पारले त्याला एक कल्पना सुचली कामगाराला हायजॉक करण्याची आपण नेता होण्याची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे, कामगारांचे पगार थकले आहेत मी तुमचे सगळे पैसे मिळवून देतो असे सांगत त्याने संबंध नाराज कामगारांना संघटित करून करून कामगारांच्या थकित पगारासाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर येथे सेवानिवृत्त कर्मचारी कामगारासह उपोषणा बसला होता त्याच्याबरोबर इतर राजकीय काही मंडळी बसले होते. साखर आयुक्त कार्यालयासमोर घोडके याने काही दिवस उपोषणही सुरू केले होते त्यावेळी त्याने अचानक सुरू उपोषण बंद केले होते त्याच्या या आंदोलनामुळे आमदार अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकित पगारामुळे नाहक मोठी बदनामी होत होती. आपण जिल्ह्यातील कारखान्यातील कामगारांचा नेता झाल्याचे त्याला नशा चढली होती त्यामुळे तो हवेतच वावरत असल्याचे दिसून येत होते. त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिजिटलही लावले त्यावर स्वतःचा फोटो टाकून मी कामगारांचा नेता असल्याचे भासवत चौकातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष या डिजिटल कडे जात होते.  कामगार नेत्याने सध्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधातील बसलेले उपोषण थांबवतो असा पेशाने वकील असणाऱ्या घोडके यानी निरोप आपल्या विश्वासू कार्यकर्त्यामार्फत आमदार अभिजीत पाटील यांच्या कार्यकर्त्याकडे काही अटीवर पोहच केला. संबंधित घोडके यांच्या कार्यकर्त्यांनी हा निरोप व्यवस्थित आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्याकडे पोहोचवल्यानंतर देव - घेवचे आर्थिक बोलणे झाले. त्यातील काही रक्कम टोकन म्हणून घोडके यांना देण्याचे ठरले गुरुवार दि. 10 रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान आमदार पाटील याचे कार्यकर्ते व किरण घोडके हे  दहा लाखाची रक्कम देण्यासाठी राधेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी अँड. किरण घोडके यांना दहा लाखाची रक्कम ठरल्याप्रमाणे सुपूर्त करण्यात आली. परंतु घड्याळाचे काटे उलटे फिरले गोरगरीब सेवानिवृत्त कामगारांच्या डोळ्यात धूळ फेक करून तोंडातील घास हिरावून घेणाऱ्या वकील किरण घोडकेला निसर्गाने  माफ केले कामगारांच्या जीवावर नेता होण्यासाठी गेलेल्या घोडके याला 10 लाखाची खंडणी स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून त्याला गजाआड केले.  त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वकील किरण घोडके यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी गुन्हा दाखल केला आहे.

        कामगारांचा विश्वास घात केल्याने कारखान्यामधील सेवानिवृत्त कर्मचारी कामगारांमध्ये घोडके विषयी तीव्र नाराजी पसरली आहे तर काही कामगारांनी घोडकेचा जाहीर निषेध केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)