पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी यात्रेत लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी श्रीविठ्ठल- रुक्मिणीमाता अहोरात्र उभे असतात. या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात. श्रीविठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो.
त्यामुळे बुधवार दि.16 रोजी श्रींची प्रक्षाळपूजा करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

