ही स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने त्वरित संपूर्ण शहरातील केर कचरा हा गोळा करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली. त्यामुळे पंढरपूर शहर हे आता हळूहळू स्वच्छ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
पंढरपूर शहरातील मंदिर परिसर, शिवाजी चौक, चौफाळा, स्टेशन रोड, संत पेठ, कोळी गल्ली, 65 एकर परिसर रिद्धी सिद्धी येथील प्रदक्षिणा शेड व उपनगरे या संपूर्ण परिसरामध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेची मोहीम सुरू झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील रहिवासी नागरिक नगरपालिकेचे कौतुक करीत असून अशीच स्वच्छता वर्षभर सदैव राहावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.

