आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

0


माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

               पंढरपूर ( प्रतिनिधी ) - माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्या उपक्रमामध्ये माढा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने माढा येथे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.अशी माहिती विठ्ठल प्रतिष्ठानचे सदस्य नितीन सरडे यांनी दिली.

            नितीन सरडे पुढे माहिती देत असता ते म्हणाले, माढा तालुक्यातील महिला, पुरुष, लहान मुले, मुली यांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्या कडून केली जाणार आहे. या मध्ये हाडांचे विकार, एक्सरे, वाचा दोष, मोफत शस्त्रक्रिया, नेत्ररोग तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग, स्त्री रोग, कॅन्सर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे. कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून देण्यात येणार आहे.

            वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजीत चोपडे, डॉक्टर प्रशांत निकम, डॉक्टर सुयोग बुरकुटे, डॉक्टर अनिल कोरे, डॉक्टर सारंग बुरकुटे जगदाळे हॉस्पिटल बार्शी, डॉ.गणेश इंदुलकर, डॉ.अनिल डांगर, डॉ.विठ्ठल लटके, डॉ.राहुल मांजरे पाटील हे बार्शी येथील कॅन्सर तज्ञ आदी नामवंत असलेली वैद्यकीय डॉक्टर यांच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत.

     दि. 1ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत माढा ग्रामीण रुग्णालय येथे बुधराणी हाॅस्पिटल पुणे व माढा शहर डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने शिबीर घेण्यात येणार आहे अशी माहिती नितीन सरडे यांनी दिली.

            तसेच लोकप्रिय आमदार अभिजित (आबा) पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान, विविध आजारांवरील तपासण्याही घेण्यात येणार असल्याचे श्री विठ्ठल प्रतिष्ठानने कळविले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)