द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीबाबत आ. अभिजीत पाटील यांनी विधानसभेत उठवला आवाज

0
सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही. मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही - आमदार अभिजीत पाटील


           माढा (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व माढा तालुक्यातील मानेगाव या परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जवळपास २०,००० हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने फक्त ३३ हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे केल्याचे गंभीर वास्तव आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज विधिमंडळात मांडले.

             “सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही. मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही,” असा जोरदार आक्रमक सूर आमदार पाटील यांनी धरला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून सरसकट मदत देण्याची मागणी केली.

          या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आमदार पाटील यांनी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

         शेतकऱ्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)