श्रीक्षेत्र निरानरसिंहपुर (ता. इंदापूर) - येथील चैतन्य विद्यालय व श्री. सु. गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज यांची 750 वी जयंती सामुहिक पसायदानाने मोठ्या उत्साहात साजरी झाली. या दिवसाचे औचित्य साधून इ.10 वी व इ.12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यी प्रथम, द्वितीय, तृतीय,..प्रत्येक विषयात सर्व प्रथम तसेच इ, 8 वी व इ. 9 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यी प्रथम, द्वितीय विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने व खाजगी देणगीदारांची बक्षिसे देऊन सत्कार व पारितोषिके तसेच रोख रक्कमा देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी कार्यवाह श्रीकांत दंडवते, खजिनदार मगनदास क्षीरसागर, शि. प्र. मंडळ जेष्ठ सदस्य प्रशांत दंडवतेसाहेब, शि.प्र.मंडळ सदस्य शामराज (प्रमोद) दंडवते, ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज, माजी शिक्षक बंधु कुंभार सर व सौ. कुंभार मॅडम, माजी मुख्याध्यापक दुनाखे सर, प्राचार्य लोखंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद सन1994/95 च्या बॅचचे माजी विद्यार्थी, यशस्वी व गुणवत विद्यार्थी पालकासह उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज होते, प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले. पसायदान शि. प्र.मंडळ सदस्य प्रशांत दंडवते यांनी सर्व विद्यार्थ्या समवेत म्हटले व शांतीपाठ झाला. यानंतर सर्वांचे सत्कार झाले, नंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके सर्वच मान्यवरांचे हस्ते देण्यात आली...मनोगते व्यक्त करण्यात आली.
प्रथम माजी विद्यार्थी हेमंत ताटे देशमुख यांनी शाळेचा व शिक्षकांचा गौरव केला. त्या नंतर सदस्य प्रशांत दंडवते साहेब यांनी मौलीक विचार मांडले, कार्यवाह श्रीकांत दंडवते साहेब यांनी पसायदानाचे औवी बध्द अर्थासह माहिती कथन केली. माजी मुख्याध्यापक दुनाखे सर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाविषयी, ज्ञानेश्वरी कुठे लिहली व त्याचा भावार्थ सांगीतला. अध्यक्षीय भाषण म्हणजे प्रवचन श्री.ह.भ.प अंकुश महाराजानी केले. त्यांनी पयायदानाचे "आता" पासून..ते सुखीया झाला.!..शांती.!.शांती.!.पर्यंत प्रत्येक ओवीचा अर्थ, त्याचे महत्व, विश्वात्मक देवासाठी मागीतलेले दान हे पसायदान.!..सर्व दृष्टांत, दाखले, ज्ञानेश्वरीचे समाजासाठी उपयोजन, महत्व पटवून दिले. सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थ्यी, व्यासपीठावरील मान्यवर यांना मंत्रमुग्ध केले.!..पसायदानाची माहीती सहज व सोप्या व विद्यार्थ्यांना समजेल अशा पध्दतीने सांगीतली.!..
सन 1994/95 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सर्व वर्गा मध्ये ₹ 51000 इलेक्ट्रीक साहित्य फिंटींग व मजूरी ₹ 8000 एकुण - 58000/-₹ ची देणगी देऊन सहकार्य केले.!..माजी विद्यार्थी हेमंत ताटे, काजळे, संतोष रिकीबे, दत्ता कोळी यांचा शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.!..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतीक विभाग प्रमुख लावंड सर यांनी केले तर आभार मराठीचे जेष्ठ शिक्षक श्री. पडळकर सर यांनी मानले.

