नगरपालिकेच्या शाळा टिकवून ठेवणे ही जबाबदारी सर्वांवर - रोहन परिचारक

0
परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात समाज उपयोगी कामांचा धडाका
        पंढरपूर (प्रतिनिधी) - खाजगी शाळा नेटाने पुढे येत आहेत. या शाळांमधून पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत शिक्षण मिळत आहे. त्यामुळे 
सरकारी शाळांचा पट कमी होत आहे, याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज असून, नगरपालिकेच्या शाळा टिकवणे ही आता सर्वांचीच जबाबदारी होऊन बसली आहे. 
नगरपालिकेच्या शाळांना सर्वतोपरी सहकारी केले जाईल, असे आश्वासन युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक यांनी दिले.
       नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि मोफत शालेय साहित्याचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, संजय निंबाळकर, इकबाल बागवान, राजू सर्वगोड, आमरे मेंबर यांच्यासह 
परिचारक पार्टीचे बहुतांशी नेते मंडळी उपस्थित होते.

          कर्मयोगी माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण आणि जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचा धडाका सुरू आहे. विद्यार्थी, युवक, वृद्ध मंडळी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. संजय निंबाळकर यांच्याकडून नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शालेय साहित्याचे वाटप हा उपक्रम घेण्यात आला.
             नगरपरिषदेच्या २० शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रोहन परिचारक यांनी, माजी आमदार प्रशांत परिचारक हे एक तत्त्वशील नेते आहेत. रंगरंगोटी आणि भपका यापासून ते कायमच दूर असतात. विधायक कार्य करण्यात सतत मग्न असतात,  दरवर्षी वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये यासाठी, बाहेरगावी जात असतात. परंतु यावर्षी कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केल्याने त्यांनी थांबण्याचे ठरवले. याचवेळी समाजातील गरजूंना मदत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनीही त्यास भरभरून प्रतिसाद देत, पंढरपूर शहर आणि तालुक्यात समाज उपयोगी कामांचा धडाका उडवून दिला, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)