🌳हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 🔴
पंढरपूर (प्रतिनिधी) - नगरपरिषद पंढरपूर करिता हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत ३२,५०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यानुसार हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर नगरपरिषदेने वृक्ष लागवडीचा संकल्प करून वृक्षारोपण अभियानास सुरवात केली आहे.
या अभियाना अंतर्गत दि. १/०८/२०२५ रोजी पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यान कॉर्नर ते बडोदा बँक स्टेशन रोड येथील रस्ता दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
मा. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी मा. मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी, नगर अभियंता प्रकाश केसकर, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे, लेखापाल करुणा शेळके, लेखापरीक्षक प्रशांत पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, उपनगरअभियंता सुमित पाटील, भांडार विभाग प्रमुख विजय शहाणे, स्वच्छता निरीक्षक नाना गोरे, उद्यान विभाग प्रमुख सुवर्णा हाके, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव , चेतन चव्हाण, ईश्वरकट्टी , कृष्णकांत कुलकर्णी व इतर कर्मचारी यांनी वृक्ष लागवड केली.

