सर्वसामान्य भोळ्या-भाबड्या भक्तांचा विचार करणारा एक तो पंढरीचा श्रीपांडुरंग आणि श्रीपांडुरंग सहकारी साखर कारखाना, अर्बन बँक निर्मिती करून बोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित तरुणांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावणारा पंढरीचा तो दुसरा पांडुरंग म्हणजे 'श्रीमंत सुधाकरपंत परिचारक उर्फ मोठे मालक'.
खऱ्या अर्थाने सहकाराची गंगा घरोघरी पोहचवणारा एक विलक्षण अवलिया म्हणजे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक..!! जिथं डोकं टेकवून नतमस्तक व्हावं अशी आदर्शाची जागा म्हणजे सुधाकरपंत परिचारक. शेतकऱ्यांच्या उत्कर्षाची भव्य दिव्यत्वाची मूर्ती म्हणजे आदरणीय मालक आणि मालकांचे निर्गुण निराकार रूप पाहताच आमचे कर जुळून येतात कारण तिथे 'दिव्यत्वाची प्रचिती' आपोआप होते. ज्यांच्या कार्याची दखल इतिहासाला सुद्धा घ्यावी लागेल. व त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे महान विचारवंत आपल्या सर्वस्वाचा त्याग करून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता सर्वसामान्यांचे हित आणि त्यांचे कल्याण यातच आपले सर्वस्व मानून निरंतर स्वतःला वाहून घेतलेले निष्काम कर्मयोगी म्हणजे मोठं मालक; अनेक सहकारी संस्था यशस्वीपणे उभारून त्या नावारूपाला आणणारे सहकार सम्राट आणि अनेकांच्या हाताला काम देऊन; जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज कल्याणाचे काम केल्याने सर्वसामान्य जनतेच्या हृदयात निरंतन स्थान आसणारे श्रीमंत योगी आपल्या अखंड जीवनाच्या प्रवासात नेहमी शब्दाला जागणारे शब्दप्रभुः विश्वास आणि आधार याचे जिवंत उदाहरण म्हणजेच मोठे मालक; सहकारातील डॉक्टर; महाराष्ट्राच्या राजकारणातील 'संत' म्हणून ओळखले जाणारे निष्कलंक चारित्र्य संपन्न लोकनायक म्हणजे आदरणीय सुधाकरपंत परिचारक...!!
स्व. सुधाकरपंत परिचारक हे सहकारी संस्थांसाठी 'परिस' होते. कारण ज्यास हात लावला त्याचे 'सोने' झाले. अनेकांचे संसार त्यांनी संस्थांच्या प्रगतीतून फुलविले. त्यामुळेच त्यांना 'सहकार तपस्वी' म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचा पगडा त्यांचेवर होता. राजकारणातील 'संत' म्हणून ओळखले जाणारे 'पंत' राजकारणात असूनही 'चारित्र्यसंपन्न' राहिले. सा. पंढरी संदेशच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी होते. वारकरी संप्रदायाविषयी असणाऱ्या आवडीमुळे ते सा. पंढरी संदेशचे 'आधारस्तंभ' बनले.
'मरावे परी किर्तीरूपी उरावे' या काव्यपंक्तीला साजेसं जीवन ते जगले. आयुष्यभर अत्यंत साधं राहून रयतेला 'श्रीमंत' बनवणारा एकमेवाद्वितीय किमयागार म्हणजे 'श्रीमंत योगी आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक'.
कै. सुधाकरपंतानंतर पांडुरंग परिवार त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यांचे नातू प्रवण, रोहन, ऋषिकेश, डॉ. प्रितीश हे सारेच समाजसेवेत कार्यरत आहेत. पंतांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नातवांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. श्रीमंतांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त सा. पंढरी संदेश परिवाराचे वतीने त्यांना विनम्र अभिवादन...!!!

