पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकात पावसाचे पाणी आहे. शेतकरी चिंतेत आहे. अशावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची, पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले.
पंढरपूर तालुक्यात शेटफळ-कासेगाव, शेटफळ-तनाळी, शेटफळ-मेथवडे रोडवरील ओढ्याचे पाणी, खर्डी येथील सांगोला ओढा, बेलाच्या ओढ्याचे पाणी, खताळ वस्ती, काळा खोरा, तनाळी रोड येथे अतिवृष्टीमुळे खर्डी, त.शेटफळ आणि परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे संकट ओढावले आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. अशावेळी परिचारक यांनी त्यांना आधार देऊन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रश्न मांडत आवश्यक ती तात्काळ मदत देण्याबाबत आश्वस्त केले. तसेच याबाबत थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील भेट घेऊन चर्चा केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराचे तात्काळ पंचनामे करण्याची देखील विनंती प्रशासनास प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी प्रणव परिचारक यांच्यासोबत तालुक्यातील अनेक गावातील राजकीय पदाधिकारी तसेच विलास हजारे, हरिभाऊ खताळ, माजी सरपंच रमेश हाके, सरपंच भगवान सव्वाशे, नारायण रोंगे, समाधान रोंगे, समाधान चंदनशिवे, मीनाज पठाण, मीनानाथ हाके, कृष्णा चौगुले, संतोष गुरव, व्यंकटेश गायकवाड, बबलू ननवरे, अजित बोडके, रामभाऊ खुडे, बंडू चौगुले, तुकाराम माने, औदुंबर पाटील, गणेश सुरवसे, अण्णा कांबळे, सागर सप्ताळ, महेंद्र कांबळे, राजू रंधवे, संतोष कांबळे, रामभाऊ खुडे, अण्णा खुडे, अंकुश माने, सतीश गोरे, बिरा महानवर, सुरेश महानवर, बिटु हाके, अंकुश खताळ, दत्ता हाके यांच्या सह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

