श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पूरग्रस्तांना मदतकार्य करण्यात आले.
पंढरपूर (प्रतिनिधी) - बार्शी तालुक्यातील भोईंजे गाव व माढा तालुक्यातील सुलतानपूर आणि पुणे भागात नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी खालील मदत साहित्य सुपूर्त करण्यात आले:
1700 अन्नपाकिटे, 1700 लाडू प्रसाद पाकिटे, 2000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या.
महाराष्ट्रात आकस्मिक आलेल्या पुराच्या संकटात श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत मानवतेच्या दृष्टीने मदतकार्य अविरतपणे सुरू आहे. माननीय सह-अध्यक्ष, मंदिरे समितीचे सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत अन्नपाकिटे व आवश्यक साहित्य पुरविण्याचे कार्य सातत्याने राबविले जात आहे.
या मदतकार्यावेळी सदस्य जळगावकर महाराज, सदस्या नडगिरे मॅडम, प्रभारी व्यवस्थापक श्री. पृथ्वीराज राऊत, लेकाधिकारी श्री. मुकेश आनेचा
यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्नपाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचविण्याची व्यवस्था केली.
सर्वांच्या अविरत प्रयत्नांमुळे पूरस्थितीत अडकलेल्या बांधवांना अन्नपाकिटे, पिण्याचे पाणी व लाडू प्रसाद वेळेवर पोहोचविण्यात आले असून, यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

