पंढरपूर बाजार समितीला उत्कृष्ठ बाजार समितीचा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार

0
पंढरपूर बाजार समितीला उत्कृष्ठ बाजार समितीचा मा. वसंतरावदादा पाटील राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार प्रदान

             पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांचे तर्फे सन २०२५ करिता देण्यात येणारा मा. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार २०२५ राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधुन उत्कृष्ठ कार्य करणारी बाजार समिती म्हणून कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर या बाजार समितीस मिळाला. या पुरस्काराने पंढरपूर बाजार समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

           महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांचे वतीने बाजार समितीमध्ये विविध उपक्रम, कामकाज, सोयीसुविधा व आर्थिक निकषाच्या आधारे पंढरपूर बाजार समिती पात्र ठरून राज्यस्तरीय मा. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार - २०२५ राज्य बाजार समिती संघाच्या पुणे येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीचे सभापती, मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड, उपसभापती, मा.श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे, व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे उपस्थित राहुन स्विकारला. सदर कार्यकमास बाजार समिती संघाचे सभापती मा.श्री प्रविणकुमार नाहाटा, उपसभापती मा.श्री. संतोष सोमवंशी, संचालक मंडळ व राज्यभरातील बाजार समित्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

             कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या आशिर्वादाने व सोलापूर जिल्हयाचे मा. आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक साहेव यांच्या नेतृत्वाखाली, मा.श्री. उमेशमालक परिचारक, चेअरमन युटोपियन शुगर्स लि., कचरेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आज पर्यंतचे आजी-माजी सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, शेतकरी, आडते, व्यापारी, सचिव, अधिकारी, कर्मचारी. हमाल, तोलार व सर्व संबंधीतांचे सहकार्याने पंढरपूर बाजार समितीचे कामकाज उत्तम प्रकारे चालु आहे. पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने पायाभुत सुविधा व इतर सेवा सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर निकषांमध्ये, पात्र ठरत सदर पुरस्कार प्राप्त केला आहे. पंढरपूर बाजार समिती नेहमीच शेतकरी यांचे हितासाठी काम करित आहे. अशी माहिती पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती मा.श्री.राजूबापू विठ्ठलराव गावडे यांनी दिली व त्यांनी सर्व संबंधीतांचे अभिनंदन केले.

         यावेळी बाजार समितीचे संचालक सर्वश्री श्री. दिलीप त्रिंबक चव्हाण, तानाजी चंद्रकांत पवार, हरिभाऊ मच्छिंद्र फुगारे,  महादेव पंढरीनाथ बागल, संतोष पंढरीनाथ भिंगारे, सौं. शारदा अरूण नागटिळक, सौ. संजिवनी बंडू पवार, महादेव सुखदेव लवटे,  नागनाथ भिमराव मोहिते,  अभिजीत दिनकर कवडे, पंडीत मारूती शेवडे, वसंत महादेव चंदनशिवे, शिवदास वामन ताड, सोमनाथ सदाशिव डोंबे,  यासीन अजीज बागवान, आबाजी औदुंबर शिंदे आदीसह सचिव श्री. कुमार नामदेव घोडके, सहा. सचिव श्री. गजेंद्र सदाशिव जोशी, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)