रेड अलर्टमुळे भिमाची वार्षिक सभा ऑनलाईन

0
         टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) - भिमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी कारखाना परिसरात घेण्याचे नियोजित करण्यात आले होते.
             मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः कारखाना परिसरात अतिवृष्टी सुरू असून, स्थानिक प्रशासनाने 27 व 28 सप्टेंबर 2025 या दिवशी संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. या परिस्थितीत रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, सभासदांना प्रवास करणे कठीण व असुरक्षित ठरत आहे.

           सभासदांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

           सभेच्या ऑनलाईन सहभागासाठी आवश्यक दुवा सर्व सभासदांना फोन कॉल, मजकूर संदेश (SMS) तसेच माध्यमांद्वारे कळविण्यात येणार आहे.

      भिमा सहकारी साखर कारखाना नेहमीच पारदर्शकता, जबाबदारी आणि सदस्यहित जोपासत कार्यरत असून, प्रतिकूल परिस्थितीत देखील सभासदांच्या सहभागास प्राधान्य दिले जाईल.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)