पंढरपूर तालुका पोलिसांनी केली जम्बो कारवाई
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील तालुका पोलिसांनी सोमवारी पहाटेच चिंचोली भोसे येथील वाळू तस्करीवर छापा टाकत जेसीबी, हायवा आणि तीन ट्रॅक्टर यांच्यासह 15 ब्रास वाळू, असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत धनाजी गंगाधर दगडे (वय ३६) रा. गुरसाळे, विजय उर्फ राजू शंकर आडगळे रा. गार्डी, किशोर शिवदास आवटे रा. चिंचोली भोसे, उमेश बाबुराव बोबडे गुरसाळे, गणेश बापू सोनवणे रा. चिंचोली भोसे, शंकर नवनाथ नवगिरे रा. चिंचोली भोसे अशा एकूण सहा आरोपीं विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींकडून संबंधित वाहनांसह एकूण १५ ब्रास वाळू
जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीं विरोधात त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्याचा अभिलेख अवलोकन करून कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, सहाय्यक फौजदार आबा शेंडगे, पोलीस हवालदार चंद्रकांत घंटे, इसाक सय्यद, कॉन्स्टेबल बालाजी कदम, ब्रह्मदेव काळे, गुटाळ, चालक हसन नदाफ आणि घाडगे यांच्या पथकाने केली आहे.

