कलापिनी संगीत महोत्सव उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - कलापिनी संगीत विद्यालय आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित कलापिनी संगीत महोत्सव २०२५ उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला. प्रसिद्ध गायक अभिषेक काळे आणि प्रख्यात सितारवादक कल्याणी देशपांडे यांनी आपल्या गायन व सितार स्वरांच्या मनमोहक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये विविध आभंग, नाट्यगीते, भावगीते त्यांनी सादर केली.
            सितार वाद्यावर वाजविण्यात आलेले अभंग प्रेक्षकांना ओळखता येतात का हे पाहताना प्रेक्षकांनी सितार वाद्यावर अभंग सादर होताना टाळ्यांच्या गजरात अभंगाचे नाव सांगितले. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार, विद्यार्थी आणि कलाप्रेमी मंडळींना समृद्ध कलामंचाचा अनुभव मिळाला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभही पार पडला असून कार्यक्रमाला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
            या महोत्सवाचे अधिकृत मीडिया पार्टनर म्हणून दैनिक पंढरी संचार दैनिक राष्ट्रसंच सहभागी झाले होते. कलाकारांनी पंढरपूरमध्ये मिळालेल्या या व्यासपीठाबद्दल समाधान व्यक्त करत स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. कलापिनी परिवाराचे संस्थापक विकास पाटील सर व सहकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, अशा उपक्रमांद्वारे स्थानिक कला पुढे नेण्याची भूमिका व्यक्त केली.
              या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॅा. कैलास करांडे,  पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे, शेटफळचे डॅा.सुरेश व्यवहारे, संजिवनी आयुर्वेद केंद्र वाडी कुरोली , I can Training institute चे विवेक भोसले, सुप्रसिद्ध फिजिओथेरपी अँड  पॉलीक्लिनिक डॅा.अमरजित गोडसे, महुदचे डॅा. दत्तात्रय ढाळे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पंकज कुंभार व अरिहंत ॲाप्टिकल्स चे अरिहंत कोठाडिया आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)