पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात नामांकित असणारा क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार यावर्षी पुण्याचे झुंजार हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. आनंदजी दवे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
पंढरपुरातील सशस्त्र क्रांतिकारक, गोवा मुक्ती वीर, हैद्राबाद सत्याग्रही, कट्टर सावरकरवादी, समाजसुधारक क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा पुरस्कार दिला जातो.
आजपर्यंत हा पुरस्कार एस. एल. भैरप्पा, मिलिंद एकबोटे, शरद पोंक्षे, बंडातात्या कराडकर, हिरामण गवळी, प्रमोद मुतालिक, हिमानी सावरकर, अभय वर्तक, धनंजय देसाई, संजीव पुनाळेकर, आदी महनीय, देव देश अन धर्मासाठी लढणार्या व्यक्तींना मिळाला.
अकरा सहस्त्र रोख, सन्मानपत्र, कु़ंडलिनी कृपाणांकित हिन्दुध्वज, श्रीविठ्ठल मंदिराशेजारी कै. बडवे दादांच्या पुतळ्यापाशी साधूसंतांच्या हातून जंगी सत्कारात हा पुरस्कार दिला जातो, की जणू श्रीविठ्ठलाचा आशीर्वादच.
तरी या कार्यक्रमास दि. 19/10/2025 रोजी सायं 7 वा, क्रांतिवीर वसंत दादा पुतळा, रुक्मिणी पटागण येथे देशप्रेमी नागरिकांनी अवश्य ऊपस्थित रहावे असे आवाहन हिंदुमहासभा व क्रांतीवीर बडवे ट्रस्टचे श्री. अभयसिंह इचगांवकर, विकास मोरे, विवेक बेणारे, महेश खिस्ते, प्रशांत खंडागळे, रामसखा बडवेकाका आदिंनी केले आहे.
श्री. आनंदजी दवे यांनी, ब्राह्मण महासंघ, हिंदू महासंघ या माध्यमातून अनेक क्रांतिकारी आंदोलने हाताळली असून, अनेक टिव्ही चर्चांतून हिंदुत्ववादी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे जनतेत या कार्यक्रमाविषयी ऊत्सुकता वाढली आहे.

