सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी पदवी प्रदान

0
 ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर केले संशोधन
          पंढरपूर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, पंढरपूर येथील इतिहास संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनी सुवर्णा ज्ञानेश्वर हजारे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून इतिहास विषयातील पीएच.डी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधन विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला : एक चिकित्सक अभ्यास’ असा होता. या संशोधनासाठी त्यांना महाविद्यालयाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. हणमंत लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

             विद्यापीठात पार पडलेल्या मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. संजय गायकवाड हे होते, तर बाह्य परीक्षक म्हणून डी.आर. माने महाविद्यालय, कागल येथील इतिहास विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष जेठेथोर यांनी काम पाहिले. सुवर्णा हजारे यांनी केलेल्या सादरीकरण, विचारमंथन, प्रश्नोत्तरे आणि परीक्षकांच्या अभिप्रायानंतर अध्यक्षांनी त्यांना पीएच.डी पदवी बहाल झाल्याची घोषणा केली.

              या मौखिक परीक्षेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पीएच.डी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. रोकडे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, प्रा. डॉ. दत्तात्रय थोरात, प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्राचार्य डॉ. तानाजी मगर, प्रो. डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. डॉ. नागिन सर्वगोड, प्रा. डॉ. धनश्री कापशीकर, प्रा. हर्षश्री वाघमोडे, प्रा. फेमिदा जेठेथोर, प्रा. डॉ. नवनाथ पिसे, प्रा. डॉ. देवेंद्र मदने, प्रा. डॉ. उमेश माने, प्रा. डॉ. अनिल येडगे, डॉ. धनंजय रणदिवे आदींसह चाळीसहून अधिक मान्यवर उपस्थित होते. मौखिक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी देवकन्या पांढरे आणि अक्षय सोनवणे यांनी कामकाज पाहिले. 

            सुवर्णा हजारे यांच्या या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, ऍड. प्रणव परिचारक, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, प्राचार्य डॉ. उदय जाधव, सरकारी वकील एड. चंद्रकांत सूसलादे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

            सुवर्णा हजारे यांच्या संशोधन कार्यासाठी डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. शिवाजी वाघमोडे, डॉ. विष्णू वाघमारे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. नारायण लोखंडे, डॉ. दिलीप कोने, डॉ. स्वप्निल बुचडे, राजेश बाणदार, एड. अभिमान हाके, रघुराज मेटकरी यांनी विशेष सहकार्य केले.

          सुवर्णा हजारे यांनी यापूर्वी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्या उमा महाविद्यालय, पंढरपूर येथील माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांचे पदवी शिक्षण याच महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्या तानाजी वाघमोडे यांच्या भाची असून प्रा. डॉ. दत्ता डांगे यांच्या सहचारिणी आहेत.

             सुवर्णा हजारे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल पंढरपूर व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)